अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री

अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये आणखी एका नव्या फ्रँचायझीचा समावेश झाला आहे. वर्ल्ड ऑफ क्रीडा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जयपूर पॅट्रीओट्स संघ अल्टिमेट टेबल टेनिस लीगच्या आगामी पर्वात खेळणार आहे. आता या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची संख्या 7 झाली असून पुढील पर्व अधिक रोमांचकारी होईल. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रवर्तित केलेल्या फ्रँचायझी-आधारित लीगचे जुलैमध्ये चौथ्या हंगामाचे यशस्वी आयोजन झाले आणि पुढील हंगामात आता आणखी एक फ्रँचायझी सहभागी होत आहे.

जयपूर पॅट्रीओट्स गोवा चॅलेंजर्स, चेन्नई लायन्स, दबंग दिल्ली टीटीसी, यू मुंबा टीटी, बंगळुरू स्मॅशर्स आणि पुणेरी पलटन टेबल टेनिस या संघासह सीझन 5 मध्ये सामील होतील. त्यामुळे फ्रँचायझी लीगचा विस्तार राज्यापर्यंत वाढवेल आणि देशात खेळाचे आणखी लोकप्रियीकरण सक्षम करेल.