पीलभीतशी नाते शेवटच्या श्वासापर्यंत

‘पीलभीतच्या लोकांसाठी माझ्या घराचे दरवाजे पूर्वीप्रमाणेच सदैव उघडे राहतील. तुमचे आणि माझे नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे. मी तुमचा होतो, आहे आणि राहणार,’ पीलभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत राहील, असे भावनिक पत्र वरुण गांधी यांनी मतदारसंघातील जनतेला उद्देशून लिहिले आहे.

ईडीकडे न जाता मोईत्रा यांनी केला प्रचार

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी आज ईडीच्या समन्सकडे पाठ फिरवली. ईडीने त्यांना आणि दर्शन हिरानंदानी यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. मोईत्रा यांना पक्षाने लोकसभेसाठी कृष्ण नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यासाठी आज प्रचार करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.