विनायक राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात, 29 मार्चपासून खळा बैठका घेऊन जनतेशी साधणार संवाद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 29 मार्चपासून लोकसभा मतदार संघात खळा बैठकांच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. 29 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान सहाही विधानसभा मतदार संघात खळा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अर्थात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला दिमाखात सुरुवात झाली आहे. खासदार विनायक राऊत यांनी जनसंपर्कावर भर दिला असून गावागावात जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्याकरीता 29 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खळा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. दि 29 मार्च रोजी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत.

30 मार्च रोजी कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत. 31 मार्च रोजी कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत. 1 एप्रिल रोजी सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघात बैठका होणार आहेत. 2 एप्रिल रोजी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात बैठका होणार आहेत. 3 एप्रिल रोजी कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत.

4 एप्रिल रोजी सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत. 5 एप्रिल रोजी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत. 6 आणि 7 एप्रिल रोजी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत. 8 एप्रिल रोजी कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात खळा बैठका होणार आहेत.