Viral Image : नोटांवर लोळणे पडले महागात, पक्षाने केली कडक कारवाई

सोशल मीडिया करमणुकीचे एक साधन आहे. त्यामुळे कधी कोणती गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. असाच आसाम मधील एका व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती 500 रुपयांच्या नोटांवर लोळताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा आसाममधील बेंजामिन बसुमतारी यांचा आहे. बेंजामिन हा आसामच्या स्वायत्त क्षेत्र बोडोलँडचा एक राजकीय नेता आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण रोजगार योजनाशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच पीएम निवास आणि मनरेगा योजनांसाठी गरीब लाभार्थींकडून लाच घेतल्याचे सुद्धा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात आली.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर बेंजामीन हा बोडोलँड मधील युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) या पक्षाचा सदस्या असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे युपीपीएल पक्षाच्या विचारसणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कारण युपीपीएल हा पक्ष भ्रष्टाचार विरोधी चळवळीसाठी ओळखला जातो. फोटो व्हायरल झाल्यानंतर युपीपीएल पक्षाचे प्रमुख आणि बोडोलँड टेरिटोरीयल काउंसिलचे (BTC) मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोरो यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांची ट्वीट (X) करत माहिती दिली की, बेंजामीन बासुमतारी यांचा पक्षाशी संबंध नाही.