विखे समर्थकांच्या अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? जनतेचा संतप्त सवाल

नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा वरदहस्त असलेले हॉटेल कुणाल पॅलेस, हॉटेल पंचशील आणि हॉटेल जनसेवा हे ही अतिक्रमणच आहे. या अतिक्रमण केलेल्या जागेवर दररोज लाखोंचा व्यवसाय होतो. मात्र, त्यांच्यावर पालकमंत्र्यांचा वरदहस्त आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे, आपल्या छोट्या व्यवसायावर कुटुंबाची उपजिवीका चालवणाऱ्यांच्या टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. रांजनगाव मसिद येथे जनतेने नाकारलेल्या स्वयंघोषीत नेत्याच्या सांगण्यावरून या टपऱ्या उध्द्वस्त करण्यात आल्या. चोर सोडून गरीबांवर अन्याय केला जात आहे. आता या अतिकर्मण केलेल्या या हॉटेल व्यवसायींकावर कार्यवाही कधी करणार ? असा संतप्त सवला टपरीधारकांसह जनता करत आहे.

विखे परिवाराने उध्वस्त केले आज अनेकांचे संसार…
गेली अनेक वर्ष अनेक कुटुंब सुपा परिसरात येऊन आपले पोट भरत होती. विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अतिक्रमणाची नोटीस पाठवून त्यांच्या उद्योग व्यवसायावर बुलडोझर फिरवण्याचे काम नगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या सुपुत्राविरोधात सर्वसामान्य माणसे एक होऊन लढली. त्याचा राग त्यांनी काढला. मतांसाठी ज्या लोकांच्या दारात या परिवाराने डोके ठेवले. मात्र, निवडणूक संपताच त्यांची गरज संपली आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले हा सर्वसामान्य तुम्हाला कधीच माफ करणार नाही. पालकमंत्री आणि त्यांना मदत करणाऱ्या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पुढार्‍यांचा जाहीर निषेध. अशा प्रकारे स्थानिकांकडून या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.