अल्पवयीन मुलांसाठी दारू व सेक्स पार्टी आयोजित करणाऱ्या महिलेला अटक

कॅलिफोर्नियात आपल्या मुलांसाठी व त्याच्या मित्रांसाठी दारु व सेक्स पार्टी आयोजित करणाऱ्या एका आईला पोलिसांनी अटक केली आहे. तिला अटक केली तेव्हा तिच्या घरात तब्बल 12 अल्पवयीन मुलं आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांना आढळून आली.

शॅनॉन ओ कोन्नोर असे त्या महिलेचे नाव असून ती कॅलिफोर्नियातील लोस गाटोस येथे तिच्या दोन मुलांसोबत राहते. तिने तिच्या दोन मुलांसाठी व त्यांच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. .या पार्टीसाठी तिने मुलांना महागडी विस्की व वोडका आणून दिला होता. तसेच कंडोम्सचेही बरेच पॅकेट्स त्यांना दिले होते. शॅनॉनने पार्टीच्या आधी मुलांना सांगितले की, ‘मी तुमच्यासाठी खास ही पार्टी आयोजित केली आहे. मस्त दारू प्या, सेक्स करा, जिवनाचा आनंद घ्या’,

दरम्यान शॅनॉनने तिच्या नवऱ्यााला तसेच मुलांच्या मित्रांच्या पालकांपासून या पार्टीबाबत लपवून ठेवले होते. दरम्यान या सर्वाबाबत पार्टीत आलेल्या एका मुलानेच फोनवरून त्याच्या पालकांना सांगितले. त्यानंतर त्या मुलाचे पालक पोलिसांना घेऊन शेनॉनच्या घरी पोहोचले. त्यावेळी तेथे 12 मुलं होती. त्यातील काही पोलिसांना आक्षेपार्ह स्थितीत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी शॅनॉनला देखील अटक केली.

पोलिसांनी शॅनॉनविरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्या मुलांना देखील तिच्यापासून लांब ठेवण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘शॅनॉनने जे केले त्यावरून ती तिच्या स्वत:च्या मुलांसाठी देखील धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मुलांना तिच्यापासून लांब ठेवण्यातच त्यांचे हित आहे’, असे त्या याचिकेत म्हटले आहे.