लग्नात फटाक्यांची आतिशबाजी ठरली जीवघेणी, सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जणांचा होरपळून मृत्यू

बिहारच्या दरभंगा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. लग्नात फटाक्यांची आतिशबाजी करताना ठिणगी घरात पडून सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली आणि कुटुंबातील 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर प्रखंडच्या अंटोर गावामध्ये लग्ना दरम्यान संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करत होते. फटाक्यांची आतिशबाजी सुरु असताना त्याची ठिणगी घरात ठेवलेल्या सिलेंवर पडली आणि तिथेच डीझेलने भरलेला ड्रम ठेवला होता त्यामुळे एकच स्फोट होऊन आगीने विक्राळ रुप धारण केले. गॅस सिलेंडरच्या स्फोटच इतका भीषण होता की, आजुबाजुला ठेवलेले डीढेलच्या ड्रमांनाही आग लागली. या आगीने विक्राळ रुप धारण केले आणि चारही बाजुला आगच आग पसरली. संपूर्ण घर आगीच्या विळख्यात आले आणि लग्नासाठी घरात ठेवलेले सामान जळून खाक झाले. तर कुटुंबातीलव 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीने विक्राळ रुप आणि किंचाळ्या ऐकून आजुबाजुच्या लोकांनी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती जिल्ह्याचे डीएम राजीव रोशन यांनाही मिळाले. त्यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरु आहे.