हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन क्रिकेट संघ; टी-20 वर्ल्ड कप संघात सात क्रिकेटपटू हिंदुस्थानी वंशाचे

आयसीसीच्या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या अमेरिकन क्रिकेट संघाला हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंची ताकद लाभली आहे. जून महिन्यात अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर होणाऱया टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात चक्क सात खेळाडू हे हिंदुस्थानी वंशाचेच असून त्यापैकी पाच खेळाडू हिंदुस्थानात जन्मलेले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेन संघाच्या कर्णधारपदाची माळ हिंदुस्थानी वंशाच्या मोनांक पटेल या खेळाडूच्याच गळय़ात पडली आहे.

जून महिन्यात सुरू होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना हा 2 जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगणार आहे. प्रथमच अमेरिकन क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.

हिंदुस्थानातील गुजरात येथील मोनांक पटेल याला 2010 मध्ये अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले. 2016 पासून मोनांक अमेरिकेत स्थायिक झाला. 2018 पासून त्याने अमेरिकेसाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी तो आयसीसी वर्ल्ड टी-20 अमेरिका पात्रता स्पर्धेसाठी क्रिकेट खेळला. या स्पर्धेत त्याने सहा सामन्यांत एकून 208 धावा केल्या. पटेल 2021 पासून अमेरिकेच्या संघाचा कर्णधार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी कॅनडासोबतच्या मालिकेसाठी अमेरिकेने आपला संघ जाहीर केला होता. त्या संघातून उस्मान रफिक, गजानंद सिंग यांना वगळले आहे. त्याजागी पाकिस्तान वंशाचा फलंदाज शायन जहांगीर आणि वेगवान अली खान यांना संघात स्थान दिले आहे.

अमेरिकन नव्हे, अर्ध हिंदुस्थानी संघ

अमेरिकेत मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी नागरिक राहत असल्यामुळे क्रिकेटच्या संघात हिंदुस्थानी वंशाचेच खेळाडू असणार हे साहजिकच होते. कर्णधार मोनांक पटेल, हरमीत सिंग, निसर्ग पटेल, सौरभ नेत्रावळकर, मिलिंद कुमार हे पाच खेळाडू हिंदुस्थान जन्मले असून काही वर्षांपूर्वी कामानिमित्त तसेच क्रिकेट खेळण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. सौरभ नेत्रवाळकर आणि हरमीत सिंग हे दोघे तर मुंबईच्या रणजी संघातही होते. तसेच मिलिंद कुमार हा दिल्लीच्या संघात होता. त्यामुळे हिंदुस्थानात संधी मिळत नसल्यामुळे हे क्रिकेटपटू अमेरिकन संघाच्या आश्रयाला गेले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानी वंशाचा फलंदाज शायन जहांगिर यालाही अमेरिकन संघात स्थान मिळाले आहे.

 अमेरिकन संघ ः मोनांक पटेल (कर्णधार), अॅरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, शायन जहांगीर, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोस्तुश पेंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शॅकविव, स्टीव्हन टेलर, अली खान.

राखीव खेळाडू ः गजानंद सिंग, जुनॉय ड्रिसडेल, यासिर मोहम्मद.

कॅनडातही हिंदुस्थानी

कॅनडातही मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू राहात असल्यामुळे या आगामी टी-20 वर्ल्ड कप संघालाही हिंदुस्थानचीच ताकद लाभली आहे. तब्बल सात खेळाडू ंिहदुस्थानी वंशाचे आहेत. मात्र या संघाचे नेतृत्व पाकिस्तानी वंशाच्या साद बिन जफरकडे सोपविण्यात आले आहे.

या संघात हिंदुस्थानी वंशाचे सात आणि पाकिस्तानचे तीन असे एपंदर दहा खेळाडू आहेत. त्यामुळे अमेरिकेप्रमाणे कॅनडालाही हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंनी घडवले आहे.

कॅनडाचा संघ साद बिन जफर (कर्णधार), नवनीत धालीवाल, एरॉन जॉन्सन, श्रेयस मोव्वा (यष्टिरक्षक), रवींद्रपाल सिंग, पंवरपाल ताठगूर, दिलप्रीत बाजवा, जुनैद सिद्दिकी, निकोलस कर्टन, परगट सिंग, रय्यान पठाण, हर्ष ठाकर, जेरेमी गॉडर्न, डिल्लॉन हेलिगर, कलीम साना.