पाच हिंदुस्थानी शास्त्रज्ञ ठरले टाइमचे हेल्थ गुरू

विशेषतः कोविडनंतर आरोग्याचे महत्व चांगलेच कळले आहे. टाइमने 2023 मध्ये आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱया 100 लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यात हिंदुस्थानी वंशाच्या 5 शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

डॉ. अलका द्विवेदी ः डॉ. द्विवेदी या अमेरिकेच्या नॅशनल पॅन्सर इन्स्टिटयूटच्या फेलो असून त्यांनी ब्लड पॅन्सरशी लढण्यासाठी NextCar 19 थेरपी विकसित केली. या थेरपीने उपचार घेण्यासाठी 40 लाखांचा खर्च येतो. पण, ही थेरपी CAR-T पेक्षा 10 पट स्वस्त आहे. या थेरपीसाठी 4 कोटींचा खर्च येतो.

डॉ. अवींद्र नाथ ः नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोकचे डॉ. अवींद्र नाथ यांना क्रोनिक फॅटीग सिंड्रोमचे कारण सापडले. हा सिंड्रोम स्त्रियांमध्ये होतो. प्रचंड थकवा, झोपेची समस्या आणि तीव्र वेदनांच्या तक्रारी यात असतात.

डॉ. व्यंकट शास्त्राr अमेरिकेतील एलजी पाथचे सीईओ डॉ.व्यंकट शास्त्राr यांनी अल्झायमरच्या चाचणीचा नवीन मार्ग शोधला. या शोधानंतर डॉक्टर आता साध्या रक्त तपासणीद्वारे अल्झायमर ओळखू शकतात.

डॉ. विवेक मूर्ती ः अमेरिकेत जनरल सर्जन म्हणून काम करणाऱया डॉ. विवेक मूर्ती यांना महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या जाणवली. त्यांनी या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानतंर शैक्षणिक संस्था आणि पंपन्यांनी एकटेपणा दूर करण्यासाठी कार्यक्रम बनवण्यास सुरुवात केली.

डॉ. सुंबुल देसाई ः अॅपल हेल्थचे उपाध्यक्ष असलेल्या डॉ. सुंबल देसाई यांनी अॅपल वॉच आणि आयपह्न वापरून नैराश्याचा अभ्यास करण्यासाठी पॅलिपहर्निया विद्यापीठ, डेव्हिस येथील संशोधकांची मदत घेतली. उशिरा झोपणे, कमी व्यायाम ही नैराश्याची कारणे दिसली.