रहाड यात्रा महोत्सव मोठ्या थाटात संपन्न

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथे आदिवासी समाजाचे कुल दैवत असलेली ग्राम देवता हेंडबा देवीचे पुरातन मंदिर असून अनेक वर्षा पासुन या ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात येतो .यात रहाड पेटविल्या जातो . ,मंदिरा समोर एक दहा फूट लांबी व एक फूट खोल असा हौद खोदण्यात येतो त्यात एक रात्र लाकडे जाळून निखारे तयार करण्यात येते आणि सकाळी 6.30 वाजता पुजारी पूजन करून भाविक त्या लख लखत्या निख्याऱ्या वरून जातात. हा त्यांच्यापरमपरेचा आणि श्रद्धेचा भाग असल्याचे मानले जाते . हा दिवस आदिवासी समाज करिता एक दिवाळी सारखा आनंद देणारा असून या वेळी अनेक अतिथी रहाडयात्रे निमित्त गावात येतात सोबतच विवाह करून गेलेल्या मुलीही गावात येण्याची परंपरा आजही चालूच आहे या निमित्त यात्रेचे आयोजन करून महाप्रसाद वाटप केल्या जातो .

या महोत्सव नामदेव मडावी, ओंकार कुमरे रणजित महेर,महादेव राऊत,विठोबा कोडापे गुणवत कोडपे, अंबादास कुमरे, मोहन सिडाम, लक्ष्मण मेश्राम,अनेक समाज बांधव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.अनेक हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते .