Lok Sabha Election 2024 : बारामतीत नवा ट्विस्ट; अजित पवारांकडून डमी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीची सर्वात लक्षवेधी लढत बारामती मतदारसंघात होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत पवार कुटुंबात सामना रंगणार आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तबत करण्यात आला. त्यामुळे येथे नणंद-भावजयमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता या लढाईत नवीन ट्विस्ट आला असून अजित पवार यांनी स्वत: डमी अर्ज भरल्याची माहिती मिळतेय.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिलपर्यंत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर काहीच वेळाने अजित पवार यांनीही डमी अर्ज दाखल केला आहे.

हे वाचा – अजितदादांची ऑफर; पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा!

बुधवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार की अजित पवार यापैकी कोणाचा अर्ज हा मुख्य अर्ज म्हणून राहतोय याकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने मिंधे गटाला दाखवली जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी जाहीर