‘बारावी फेल’ ठरला सर्वोत्कृष्ट

वांद्रेकुर्ला संकुलातील पंचतारांकित हॉटेलात क्रिटिक्स चॉईस पुरस्कार नुकताच पार पडला. या वेळी विधू विनोद चोप्रा यांचा ‘बारावी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला विक्रांत मेस्सी. त्याला ‘बारावी फेल’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला, तर ‘थ्री ऑफ अस’साठी शेफाली शाह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा मान ‘कोहरा’ला मिळाला. तसेच वेब सीरिज विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता सुविंदर विक्की (कोहरा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर) यांना गौरविण्यात आले. ‘कॉफी विथ करण’साठी सगळय़ात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून करण जोहरला गौरविण्यात आले. डिस्ने हॉट स्टारला सर्वोत्कृष्ट ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून पुरस्कार देण्यात आला.

अमृता सुभाष सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

वेब सीरिज विभागात अमृता सुभाष (लस्ट स्टोरीज सीझन 2) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार सिद्धांत गुप्ता (ज्युबिली) याला मिळाला. चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून जयदीप अहलावत (जाने जाँ), तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दीप्ती नवल (गोल्डफिश) यांना पुरस्कार मिळाला.