गुगल, यूट्युबच्या जाहिरातींवर भाजपने उधळले 102 कोटी रुपये! सर्वाधिक खर्च कर्नाटक विधानसभेवर

गुगल तसेच यूट्युबच्या जाहिरातींवर भाजपने तब्बल १०२ कोटी रुपये उधळले आहेत. 31 मे 2018 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत हा खर्च करण्यात आला असून, कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर सर्वाधिक 10.8 कोटी रुपये उधळण्यात आले आहेत. गुगलनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजपने गुगल तसेच यूट्युबवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींचे प्रमाण 26 टक्के एवढे आहे. या काळात एकूण 390 कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून, 2.17 लाख ऑनलाईन जाहिराती देण्यात आल्या आहेत. यातील १.६१ लाख म्हणजेज 73 टक्के जाहिराती या राजकीय स्वरूपाच्या आहेत. भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक 10.8 कोटी रुपये गुगल आणि यूट्युबवरील जाहिरातींवर खर्च केले आहेत. उत्तर प्रदेशसाठी 103 कोटी, राजस्थानसाठी 8.5 कोटी तर दिल्लीसाठी 7.6 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत.

यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात 19 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त खर्च केला आहे. काँग्रेसने 5.7 कोटी रुपयांच्या तर 5.3 कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेसने 5992 जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातींवर पक्षाने 45 कोटी रुपये खर्च केले असून, जे भाजपच्या तुलनेत केवळ 3.7 टक्के आहे.