ईडी केवळ राजकारण करतेय, कपिल सिब्बल यांनी ईडीवर साधला निशाणा

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावरुन ईडीवर निशाणा साधला आहे. ईडी केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत ईडीला माहित असणे गरजेचे आहे की,आता भाजपमध्ये गेलेला हार्दिक पटेल दोषी ठरल्यानंतरही त्याने निवडणुक कशी काय लढवली असा हल्लाबोल सिब्बल यांनी केला.

कपिल सिब्बल म्हणाले की, आता भाजपमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेलने दोषी ठरल्यानंतर निवडणूक कशी लढवली हे ईडीने जाणून घेतले पाहिजे. ईडीने सर्वोच्च न्यायालयासमोर आपली भूमिका मांडली आणि सांगितले की अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करू नये कारण प्रचाराचा अधिकार हा कायदेशीर अधिकार आहे, घटनात्मक अधिकार नाही. सिब्बल म्हणाले की, हे ठीक आहे, पण कायद्यात अशी तरतूद आहे की जर एखाद्याला शिक्षा झाली असेल आणि न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली असेल, तर तो निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतो. हार्दिक पटेलला विचारा की त्याने निवडणूक कशी लढवली?

हार्दिक पटेलने निवडणूक कशी लढवली हे ईडीला विचारावे. हार्दिक पटेल दोषी ठरल्याने उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हार्दिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने स्थगिती दिली.त्यानंतर हार्दिकने निवडणूक लढवली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.ज्याच्याविरुद्ध पुरावे आहेत तो निवडणूक लढवू शकतो पण जो आरोपी आहे तो निवडणूक लढवू शकत नाही.हे कसले राजकारण असा संतप्त सवाल सिब्बल यांनी केला.