पेटीएमचे शेअर्स गडगडले

 पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या दहा दिवसात मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडचे शेअर्स बुधवारी नीचांकी पातळीवर कोसळले तर शेअर्सची किंमत केवळ 317.45 रुपये इतकीच राहिली. नोएडा येथील या कंपनीच्या शेअर्समध्ये आठवडय़ाच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवार आणि मंगळवारीही घसरण दिसली. पेटीएमच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱयांना प्रत्येक शेअर्समागे 1,832.55 रुपयांचे नुकसान झाले. 2021 मध्ये पेटीएमचा 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ लॉँच करण्यात आला होता. या आयपीओची किंमत 2,150 रुपये इतकी होती. सततच्या घसरणीमुळे कंपनीचे भागभांडवलही 20,180.46 कोटी रुपयांवर घसरल्याचे चित्र आहे.