अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री विशाल गणेशाला 5101 आंब्यांचा नैवेद्य

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री विशाल गणेशाला 5101 आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राखी फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली.

याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, ‘अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला. अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय्य तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. असेच अक्षय्यतृतीयानिमित्त आंबा स्वरुपात भाविकांनी दान दिले असल्याचे सांगून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, प्रा.नितीन पुंड, चंद्रकांत फुलारी, गौरव भंडारी, अनुष्का फिरोदिया, हर्ष बोकडिया, सोहम फिरोदिया, निवेदक राजेंद्र टाक, गणेश राऊत आदि विश्वस्त उपस्थित होते.