नासानं टिपलं नक्षत्रांचं देणं

नासाच्या प्रचंड शक्तिशाली दुर्बिणीचे नाव ‘जेम्स हब स्पेस टेलिस्कोप’ आहे. तब्बल तीन मजली इमारती एवढी उंच आणि एका टेनिस कोर्टाएवढे तिचे आकारमान आहे. जेम्स वेब आणि द हबल या दुर्बिणींच्या मदतीने काढलेले आकाशगंगेचे अत्यंत विलोभनीय फोटो नासाने शेअर केलेत. जणू नक्षत्रांचं देणंच नासाच्या दुर्बिणीनं टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलंय.

जेम्स हब दुर्बिणीने पृथ्वीपासून 1 लाख 63 हजार प्रकाशवर्षे दूर डोरेडो नक्षत्रांचा भाग टिपला आहे. त्यामध्ये भगव्या, सोनेरी, पिवळय़ा, निळय़ा रंगांची उधळण होताना दिसतेय.

हॉर्सहेड नेब्युल्याचेही दर्शन घडवले आहे. हॉर्सहेड नेब्युला हा ओरियन नक्षत्रामध्ये 1300 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. याशिवाय  मृत ताऱयाचे दर्शन घडते. रिंग नेब्युला असे मृत ताऱयाचे नाव असून तो त्याच्या उक्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो लिरा नक्षत्रापासून दोन हजार प्रकाशवर्षे दूर आहे. याशिवाय पृथ्वीपासून 1350 प्रकाशवर्षे दूर अंतरावरील ओरियन नक्षत्राच्या आतील एक हृदयसदृश्य किहोल नासाने टिपले आहे. गुरू ग्रहाच्या वातावरणातील विलोभनीय ढग आणि वादळंही दिसतात. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणीच म्हणावी लागेल.