औरंगजेबासारखी वृत्ती बोललो तर त्यांना एवढं झोंबलं का? संजय राऊत यांचा सवाल

Lok Sabha Election 2024: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नेहमीप्रमाणेच सडेतोड उत्तरं देत मोदी-शहा समर्थकांना आणि भाजप खणखणीत सवाल केले आहेत. आपल्या विरोधात दाखल तक्रारीवरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, आम्ही काय चुकीचं बोललो, औरंगजेबासारखी वृत्ती महाराष्ट्रानं गाडून टाकली आहे हा इतिहास आहे. तर मग यात त्यांना झोंबण्यासारखं काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

जेवढ भाजपचं औरंगजेबावर प्रेम उमाळून आलं आहे. इतंक प्रेम का आहे औरंगजेबावर. औरंगजेब एक शासक होता आणि महाराष्ट्रावर त्याने वारंवार हल्ले केले, हत्या केल्या, लूट केली. त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्यासंदर्भात इतिहास सांगितला पाहिजे की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता. जसं आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे हे सर्व महान योद्धे महाराष्ट्रात जन्मले असं गर्वानं म्हणतो. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. त्याच प्रमाणे एका औरंगजेबाचा जन्म ज्याने संपूर्ण देशावर आपली पकड मिळवण्याचा प्रयत्न करावा लागला आणि महाराष्ट्राशी संघर्ष केला होता त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यात मी चुकीचं काय बोललो? ज्या मातीत औरंगजेबाचा जन्म झाला तिथे जन्मलेल्या राज्यकर्त्यांना थोडा गुणधर्म लागला असेल. त्याप्रमाणे मोदी-शहा तशाप्रकारे हल्ले करत आहेत. महाराष्ट्राला तोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अशी विधानं कुणाला झोंबण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी केला. मी तर काही कुणाला औरंगजेब म्हणालो नाही. औरंगजेब ही एक विकृती आहे, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं.

तसेच जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, यात व्यक्तिगत काही नाही असं राऊतांनी स्पष्ट केलं.

हा इतिहास आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षापासून आम्ही ही भाषा बोलत आहोत. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही याच मातीत गाडलेलं आहे. मग तो अफजल खान, शाहिस्तेखान, औरंगजेब असेल त्यांना गाडलं आहे. महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे. हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे. मिरच्या झोंबायचं कारण काय?, असं असेल तर त्याचे फोटो लावा तुमच्या बाजूला कारण तुम्ही त्याच वृत्तीचे सूड बुद्धीने वागणारे, धर्मांधतेचं राजकारण करणारे लोक आहात, असं त्यांनी ठणकावलं.