हसरंगाकडे नेतृत्व, टी-20 वर्ल्ड कप; लंकेचा संघ जाहीर

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी श्रीलंका संघाची घोषणा झाली. अष्टपैलू वानिंदू हसरंगाकडे या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे, आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे मथिशा पथिराना आणि महीश तीक्ष्णा यांसारख्या युवा खेळाडूंनाही श्रीलंकन संघात स्थान मिळाले आहे. शिवाय अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचीही अपेक्षेप्रमाणे संघात वर्णी लागलीय.
टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधला आहे. अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डि’सिल्वा आणि वानिंदू हसरंगा असे अष्टपैलू खेळाडू ही श्रीलंकेची जमेची बाजू असेल. गोलंदाजीची धुरा महीश तीक्ष्णा, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमिरा, नुवान तुषारा, मथिशा पथिराना आणि दिलशान मदुशंका हे सांभाळणार आहेत.
n श्रीलंकेचा संघ ः वानिंदू हसरंगा (कर्णधार), चॅरिथ असलांका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डि’सिल्वा, महीश तीक्ष्णा, डुनिथ वेललागे, दुष्मंथा चमिरा, नुवान तुषारा, मथिशा पथिराना, दिलशान मदुशंका.