नोंदणी करूनच केदारनाथ यात्रेला निघा

 

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 10 मे रोजी उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात होईल. अक्षय्य तृतीयेला गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे खुले होतील. त्यानंतर 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडतील. केदारनाथ दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिह्यात केदारनाथ मंदिर आहे. ते 12 ज्योतार्ंलगांपैकी एक आहे. मंदिराचे दरवाजे सहा महिने खुले, तर सहा महिने बंद असतात. केदारनाथची यात्रा करण्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी केली नसेल तर चारधाम यात्रा करता येणार नाही.

चारधाम यात्रेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 15 एप्रिलपासून सुरू झाले. आतापर्यंत 20 लाख भाविकांनी रजिस्ट्रेशन केले. उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेची वेबसाईट किंवा टुरिस्ट केअर उत्तराखंड ऍपवरही रजिस्ट्रेशन करता येईल.

8 मेपासून ऑफलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेय. हरिद्वार, ऋषिकेशला जाऊन ऑफलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. मात्र ऐनवेळी कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेच योग्य.