एकत्र या आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवा, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचे जनतेला आवाहन

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तब्बल 50 दिवसानंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात आपचे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी भाषण करताना केजरीवाल यांनी जनतेला एकत्र येऊन हुकुमशाहीपासून देशाला वाचवण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मी हुकुमशाहीविरोधात लढा देत आहे. पण आता देशातील 140 कोटी जनतेने देखील लढा दिला पाहिजे. उद्या सकाळी 11 वाजता आपण सर्व प्राचीन हनुमान मंदिराजवळ भेटू व भगवान हनुमानाचे आशिर्वाद घेऊ