पेनकिलर घेऊन तेजस्वी यादव प्रचारात

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करणारे तेजस्वी यादव सध्या कंबरेच्या दुखण्याचा सामना करत आहेत. त्यांना 3 आठवडे बेड रेस्ट आणि उभे न राहण्याचे आणि पायी न चालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, परंतु इंडिया आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी तेजस्वी यादव अक्षरशः पेनकिलर घेऊन आणि बेल्ट लावून प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी पंबरेला लावलेला बेल्ट दाखवला. याचा व्हिडीओ तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

रॉबर्ट वड्रांचे राज्यसभेत जाण्याचे संकेत

अमेठीतून तिकीट न मिळाल्याने प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी राज्यसभा सदस्य बनून राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. कुणालाही उत्तर देण्यासाठी मला राजकारणात यायचे नाही. मला या देशातील जनतेची सेवा करायची आहे, कदाचित मी राज्यसभेच्या माध्यमातून ती करेन. मी देशभरात फिरून जनतेची सेवा करेन, असे वड्रा यांनी म्हटले आहे.

भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू

कर्नाटकात काँग्रसने इतरांच आरक्षण लुटून त्यातील 4 टक्के आरक्षण मुस्लिमांना दिलं आहे. भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणात वाढ करु, असे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणातील प्रचारसभेत म्हणाले. तेलंगाणातील भाजप यावेळी डबल डिजिट स्कोअर गाठेल आणि पंतप्रधान मोदींना 400 पार घेऊन जाईल, असे शहा म्हणाले.