पॉस्को खटल्यासाठी हायकोर्टाची मार्गदर्शक तत्त्वे

बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉस्को) चालणाऱया खटल्यांसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पीडिता सहकार्य करत आहे की नाही हे आधी जाणून घ्या, असा सल्ला न्यायालयाने पॉस्को न्यायाधीशांना दिला आहे. यासह अन्य काही सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

न्या. एस. एम. मोडक यांच्या एकल पीठाने ही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. याची प्रत महाराष्ट्र ज्युडिशल अॅकडमीचे सहसंचालक यांना द्यावी. जेणेकरून तेथे प्रशिक्षण घेणाऱया न्यायाधीशांना याची माहिती देता येईल, असेही न्या. मोडक यांनी नमूद केले आहे.