पॉवर ड्रेसिंग

>>पूजा सामंत

पॉवर ड्रेसिंग ही एक फॅशन शैली आहे जी महिलांना पारंपरिकरीत्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांचा अधिकार प्रस्थापित करण्यास सक्षम करते.

जगभर 8 मार्च रोजी महिला दिन मोठय़ा प्रमाणावर साजरा होत असला तरी प्रत्येक स्त्रीसाठी अगदी दररोज महिला दिन असतो आणि दिवसाचे कधी 16, तर कधी 18 तास आजच्या महिला कामात गढलेल्या असतात. रस्त्यावर मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारी स्त्राr असो किंवा मल्टी नॅशनल पंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारी स्त्राr असो, तिच्या कामाचा मोबदला यात प्रचंड तफावत असली तरी तिच्या श्रमात कमी नसते. सर्वसामान्य स्तरांतील स्त्रियांना अनेकदा आंतरराष्ट्रीय महिला दिन खिजगणतीतही नसतो, पण स्त्रियांना फॅशन करणे मात्र आवडते हे एक शाश्वत सत्य.

दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा होणाऱया आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा अधिकृत रंग जांभळा, हिरवा आणि पांढरा आहे. हे रंग स्त्रियांच्या मताधिकार चळवळीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले होते. जांभळा न्याय आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. हिरवा आशेचे प्रतीक आहे आणि पांढरा शुद्धतेचे प्रतीक आहे. या रंगसंगतीचे औचित्य ध्यानात घेतले जातेच असे नाही, पण अनेक क्षेत्रांतील विशेषतः प्राध्यापक, अधिष्ठाता, मल्टी नॅशनल पंपन्यांमधील उच्चपदस्थ महिला, सेल्स, मार्केटिंग, बँकिंग स्टाफ सर्वत्र ‘पॉवर ड्रेसिंग’ हा एक प्रकारे ड्रेस कोड ठरला आहे. 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेले आणि 1980 च्या दशकात विकसित झालेले पॉवर ड्रेसिंग ही एक फॅशन शैली आहे, जी महिलांना पारंपरिकपणे पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांचा अधिकार प्रस्थापित करण्यास सक्षम करते. पॉवर ड्रेसिंग केलेल्या महिलांना अधिक आत्मविश्वास, खंबीर आणि सक्षम वाटू शकते असा ट्रेंड आहे. पॉवर ड्रेसिंगमुळे नोकरी-व्यवसायात बढतीच्या संधी वाढतात, स्त्राrमध्ये आत्मविश्वास वाढतो हे मात्र निश्चित!

लक्षवेधी ड्रेस कोड

फॅशन डिझायनर पल्लवी सिंघी महिला दिनाच्या फॅशन ट्रेंड्सबद्दल बोलताना म्हणतात, महिला दिनी तुमच्या लुककडे सगळय़ांचे लक्ष वेधले जाईल, असा ड्रेस कोड असावा. स्ट्रायकिंग कलर असावेत. लाल सिंदुरी किंवा चेरी रेड, टोमॅटो रेड रंगामुळे व्यक्तिमत्त्व उठावदार निश्चित दिसेल.

यंदाच्या ट्रेंडनुसार सर्वत्र ‘कॉर्सेट’ दिसून येतात. या कोर्सेट्समध्ये ‘रिच पर्पल’ कलर विथ स्मॉल प्रिंट्स अगदीच उठून दिसतील. पॉवर ड्रेसिंगचा विचार असल्यास ब्राऊन पँट्स -नेव्ही ब्ल्यू शर्टस् आणि लाईट शेड्समध्ये ब्लेझर हा यंदाचा ‘हॉट अॅण्ड हिट’ लुक आहे. बारीक मोत्यांची माळ आणि कानात मोती किंवा डायमंड्सचे टॉप्स हा खूप सोफिस्टिकेटेड लुक असे. ब्लेझर स्लिक किंवा वेलफिटेड असले पाहिजे. पारंपरिक साडी किंवा स्टायलिश कुडता आणि पेन्सिल पॅन्ट, त्यावर मॅचिंग सँडल्स हादेखील ट्रेंड आणि लेटेस्ट लुक आहे.

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे ड्रेस किंवा साडी, वेस्टर्न परिधान अगदीच स्कर्ट-टॉप या ड्रेसवर बीड्सची अॅक्सेसरिज हादेखील एक नवा आणि तरुणीमध्ये लोकप्रिय ट्रेंड आहे. साडी व त्यावर जॅकेट असा मिक्स आणि मॅच असा ड्रेसदेखील घालू शकता. कॉम्प्लिमेंट मिळवू शकता. आपको क्या पसंद है हा खरा प्रश्न आहे.