माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अंमली पदार्थ पेरून वकिलाला अडकवल्याचा ठपका ठेवून 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्हायातील पालनपूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गुन्हेगारी प्रकरणात संजीव भट दोषसिद्ध असल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांना 2019मध्ये जामनगर न्यायालयातही कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषाचा ठपका ठेवण्यात आला आहे. बुधवारी अतिरिक्त जिल्हा आि सत्र न्यायाधीश जे. एन. ठक्कर यांनी भट यांना राजस्थानच्या एका वकिलाला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी दोषी मानलं आहे.

संजीव भट्ट यांची सेवा 2015मध्ये समाप्त करण्यात आली होती. त्यावेळी बनासकांठा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. जिल्हा पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंह राजपुरोहित यांना अंमली पदार्थ कायद्यातंर्गत अटक केली होती. राजपुरोहित राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर बनासकांठा पोलिसांनी पाली येथील एका वादग्रस्त संपत्तीच्या स्थानांतरणावरून या प्रकरणात राजपुरोहित यांना अडकवल्याचं उघड झालं होतं.