पोलीस असल्याचे भासवून केले अपहरण

पोलीस असल्याची बतावणी करून पैशासाठी एकाचे अपहरण करून धमकावल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याचा समांतर तपास क्राईम ब्रँचचे पथक करत आहेत.

दहिसर पूर्व येथे तक्रारदार राहतात. मंगळवारी दुपारी त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने तो लोअर परळ क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे समन्स आले असून तुम्ही खोटा पत्ता का दिला असे त्याना सांगून फोन कट केला.

दुपारी ते घरी एकटे असताना त्याना त्याच्या मित्राने फोन केला. फोन केल्यावर ते खाली आले. तेव्हा त्याच्या मित्रांसोबत आणखी तीन जण होते. तिघांपैकी एकाने त्याना तुम्ही ज्या दुकानात काम करत होते, तेथे काही घोटाळा केला आहे , ते पैसे परत कर असे सांगून पोलीस ठाण्यात चल असे सांगितले. त्या तिघांनी तक्रारदाराला रिक्षात बसवले. ते तिघे रिक्षाने घोडबंदरच्या दिशेने जाऊ लागले. जुन्या शेठ सोबत बोलण कर असे सांगून एकाने त्याच्या जुन्या मालकाला फोन केला. तेव्हा मालकाने चर्चा करून फोन कट केला. शेठ सोबत चर्चा झाली असून पैशाची व्यवस्था कर असे  सांगितले. आपल्याकडे पैसे नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. तेव्हा त्यांनी तक्रारदाराला मारहाण करत तेथेच सोडून ते निघून गेले.