‘सिमी’ संघटनेवरील बंदी वाढवली

terrorist

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील विविध राज्यांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध अधिनियम 1967) अन्वये स्टुडंट ऑफ इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर घातलेली बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे.

सिमीवर 2001 साली पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही बंदी वाढवण्यात आली आहे. 2019 सालीही सिमीच्या बंदीला पाच वर्षांची मुदतवाढ दिली होती. ही बंदीची मुदत संपताच 29 जानेवारी 2024 पासून बंदीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या बंदीबाबत कोणाला काही हरकत असल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखा क्रमांक-1 बरोबर संपर्क साधावा, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.