संदेशखळी प्रकरणातील सीबीआय तपासाला तृणमूलचे सुप्रीम कोर्टात आव्हान

संदेशखळी येथील महिलांवरील अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देणाऱया कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध प. बंगाल सरकारने केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्या. बी.आर. गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. संदेशखळी प्रकरणी 10 एप्रिल 2024 रोजी हायकोर्टाने दिलेल्या आदेशाने पोलीस दलासह संपूर्ण राज्य यंत्रणेचे मनोधैर्य खचले आहे, असे प. बंगाल सरकारने याचिकेत म्हटले आहे.

राज्य पोलिसांचे अधिकार काढून घेतल्याचा आक्षेप

याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकांमध्ये केलेल्या आरोपांशी संबंध नसलेल्या प्रकरणांतही सीबीआयला तपास कामात सर्व ते सहकार्य करावे, असे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. मात्र कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे