मनगटावरचा फोन

प्रसिद्ध स्मार्ट फोन कंपनी मोटोरोलाने बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 मध्ये एक अफलातून स्मार्ट फोन शोकेस केला आहे. याफोनचे खास वैशिष्टय़े म्हणजे हाफोन खिशात ठेवण्याची गरज नाही. तर थेट आपल्या हाताच्या मनगटावर बांधून ठेवता येतो. मोटोरोला पंपनीने याफोनला शेप शिफ्टिंगफोन असे नाव दिले आहे. याफोनचे खास फीचर्स म्हणजे याफोनमध्ये 6.9 इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला आहे. याफोनच्या मागील बाजूस फॅब्रिक मटेरियल वापरण्यात आले आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच असा याचा दुहेरी वापर होईल.