‘अब की बार 400 पार’ हे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहणार; प्रशांत किशोर यांचे महत्त्वाचे भाकीत

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच काही सर्वेक्षणामध्ये देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जादू चालणार असल्याचे दिसून आले आहे. आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि भाजप याबाबत महत्त्वाचे भाकीत केले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला काही जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपला 300 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘अब की बार 400 पार’ हे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहणार असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटल्याचे दिसत आहे. तसेच इंडिया आघाडीचेही भाजपसमोर आव्हान आहे. त्यामुळे 400 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळवणे कठीण असल्याची शक्यता किशोर यांनी व्यक्त केली.

एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्या तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या काही जागा वाढण्याची शक्यताही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव असतानाही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या काही जागा वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.