ओबीसी राजकीय आघाडी सर्व 48 जागा लढवणार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर स्थापन झालेली ओबीसी राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागा लढवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला असून 16 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे.

ओबीसी राजकीय आघाडीची पुढच्या आठवडय़ात मुंबईत बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारने शिंदे समिती नेमून मराठा समाजाला खोटी कुणबी प्रमाणपत्रे वाटल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या खोटय़ा प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण दिले जाईल, ज्यामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल असा आघाडीचा दावा आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण टिकवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.