राज्यकर्तेच गुन्हेगारांना ‘मोक्का’तून वाचवत असतील तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय – रोहीत पवार

पुण्यातील इंदापूर येथे एका हॉटेलमध्ये एका तरुणाची काही गुंडांनी गोळ्या घालून व नंतर कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील वाढता गुंडाराज व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ”भरदिवसा हॉटेलमध्ये गुंडावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन खून करण्याचे कधीकाळी उत्तर भारतात सर्रास घडणारे गुन्हे आता कायद्याला धाब्यावर बसवून महाराष्ट्रातही (इंदापूर) घडताना दिसतायेत.. राज्यकर्तेच गुन्हेगारांना ‘मोक्का’तून वाचवत असतील आणि काहीजण गुन्हेगारांना भेटून बुके देत असतील तर गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत तर काय? मग सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय?”, असा सवाल त्यांनी ट्विटर पोस्टमधून केला आहे.