सेन्सेक्स उसळला

आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 190 अंकांची उसळी घेत 72,832 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 22,096 अंकांवर बंद झाला. मिडपॅप आणि स्मॉलपॅप निर्देशांकात सुमारे अर्धा टक्का वाढ झाली. हिरो मोटोकॉर्प, मारुती, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाईफ, सन फार्मा निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ झाली. आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, पंझ्युमर डयुरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस शेअर्स वाढीसह बंद झाले. मात्र आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक 838 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये एलटीआय माइंडट्री, इन्पहसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, टीसीएस शेअर्सचा समावेश होता.

मार्केट दोन दिवस बंद

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दोन दिवस आराम मिळणार आहे. 24 आणि 25 मार्च असे दोन दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन दिवस बंद राहणार आहेत. पुढील आठवडय़ात सोमवार आणि शुक्रवारीही शेअर मार्केट बंद असणार आहे. 29 मार्चला गुड फ्रायडे आहे. त्यामुळे बाजार बंद ठेवला जाणार आहे

एअरटेलचे नवे प्लान

एअरटेलने क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल बोनान्झा ऑफर्सची घोषणा केली. या ऑफर अंतर्गत पंपनीने तीन नवीन प्लान आणले. हे अनलिमिटेड डेटा ऑफर करते. 39 रुपये, 49 रुपये, 79 रुपयांचे प्लान्स लाँच केले. हे सर्व प्लान्स प्रीपेड युजर्ससाठी आहेत.

श्री सिमेंट काँक्रीट प्लांट

श्री सिमेंटने हैदराबादमध्ये पहिला ग्रीनफिल्ड रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट सुरू करून बांगर काँक्रिटची घोषणा केली. या प्लांटची क्षमता ताशी 90 घनमीटर इतकी आहे. यावेळी श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज अखौरी उपस्थित  होते.

ली कुपर फुटवेअर

रिलायन्स रिटेलने खास महिलांसाठी फुटवेअर कलेक्शन लाँच केले आहे. हे युनिक असून नो शू पार्टी थीमवर आहे. ली कुपर हे रिलायन्स रिटेल ब्रँड आहे. या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स, कलर्स, खास मटेरियल्स ग्राहकांना मिळणार आहे.

ममाअर्थचे उत्पादन

आघाडीचा ब्रँड ममाअर्थने विशेष उत्पादन बाजारात आणले आहे. पंपनीने आपला ब्रँड पर्सनल वॉश श्रेणीमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली. ममाअर्थ मॉइश्चरायझिंग लोशन साबण हे नॉन-ड्रायिंग फॉर्म्युलामध्ये मेड-सेफ प्रमाणपत्र असलेले ग्रेड-1चे साबण आहेत.

एसबीआयची इंटरनेट सेवा आज बंद

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची इंटरनेट सेवा उद्या, शनिवारी बंद राहणार आहे. एसबीआयच्या ग्राहक श्डय़ुल्ड ऑक्टिविटीमुळे इंटरनेट बँकिंग सेवा बंद राहणार आहे. एसबीआयने अधिकृत वेबसाईटद्वारे ही माहिती दिली. देशात एसबीआयचे 44 कोटी ग्राहक आहेत. उद्या, ग्राहकांसाठी 1.10 ते 2.10 या दरम्यान इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. यामुळे ग्राहकांना इंटरनेट बँकिंग ऑप्लिकेशन, योनो, योनो लाइट योनो बिझनेस वेबसह सर्व बँकेचे अॅप्स एका तासांसाठी बंद राहतील. बँकसंबंधी काम करण्यासाठी एसबीआयचा टोल फ्री नंबर 18001234 किंवा 18002100 वर कॉल करू शकतील.

येस बँकेची पार्टनरशिप

येस बँकेची पॅरिस ऑलिंपिक्स 2024साठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनशी अधिकृत बँक पार्टनरशिप म्हणून निवड झाली आहे. येस बँकेच्या मुंबई मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात या भागीदारीची घोषणा केली. या वेळी येस बँकेचे एमडी प्रशांत कुमार उपस्थित होते. या वेळी या कार्यक्रमात ‘मिलकर जिताएंगे’ या पॅम्पेनचे अनावरणही करण्यात आले.

रुपया सर्वात नीचांकावर

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. रुपया 34 पैशांनी घसरून प्रतिडॉलर 83.47 पैसे झाला आहे. रुपयामधील ही गेल्या काही दिवसांपासूनची सर्वात मोठी घसरण आहे. गुरुवारी रुपया 83.13 आणि बुधवारी 83.19 प्रतिडॉलरवर रुपया बंद झाला होता. रुपयांमध्ये घसरण झाल्याने पेट्रोलियम आयात महाग होईल.

सॅमसंगचे दोन स्मार्टफोन लाँच

सॅमसंग पंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी आणि गॅलेक्सी ए35 5जी हे दोन स्मार्टपह्न लाँच केले. या दोन्ही पह्नची सर्वात खास गोष्ट म्हणजे 8 जीबी रॅम, 256 जीपर्यंत इंटरनल स्टोरेज, ट्रिपल रियर पॅमेरा सेटअप दिला आहे. पंपनी दोन्ही नवीन गॅलेक्सी ए-सीरीज पह्नसाठी 4 वर्षांचे प्रमुख ओएस अपडेट आणि 5 वर्षांच्या सिक्योरिटी पॅचचे अपडेट देणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी पह्नला तीन स्टोरेजमध्ये आणले आहे.

सेबीच्या माजी प्रमुखाला अमेरिकेत दंड

बाजार नियामक सेबीचे माजी प्रमुख एम. दामोदरन यांना आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन कोर्टाने मोठा झटका दिला. कॉन्ट्रक्ट लॉसूटचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 24.84 मिलियन डॉलरचा (206 कोटी) दंड ठोठावला आहे. हा दंड अपहेल्थ आणि ग्लोकल हेल्थकेअर सिस्टमशी संबंधित एका प्रकरणात लगावला आहे. हा दंड अमेरिकेतील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनकडून लावण्यात आला आहे. अपहेल्थ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड पंपनी आहे. माजी सेबी प्रमुख एम दामोदरन ग्लोकल हेल्थकेअर सिस्टममध्ये शेअर होल्डर आहेत. दामोदरन यांच्याशिवाय, ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम, त्यांचे प्रमोटर्स, प्रमुख शेअर धारक, आणि संचालक यांनाही दंड ठोठावला आहे.

बेंटले मोटर्सचा महिलांसाठी खास कार्यक्रम

बेंटले मोटर्सने खास महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम (मेंटरशिप प्रोग्राम) च्या तिसऱ्या एडिशनची घोषणा केली. या कार्यक्रमांतर्गत युनायटेड किंग्डम (यूके), कतारमधील विद्यार्थी, विद्यापीठे आणि महिला यात सहभागी होणार आहेत. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथ, लॉफबरो, वॉरविक, मँचेस्टर मेट्रोपॉलिटन आणि कतारमधील युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स इन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

सायबरस्ट स्पोर्टस् कारचे अनावरण

एसएआयसी मोटर आणि जेएसडब्ल्यू ग्रुपने ऑटोमोटिव्ह संयुक्तपणे एकत्र येत ‘जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रा. लि.’ला साठी पार्टनरशिप केली आहे. यावेळी नव्या पंपनीसाठी  नव्या व्यावसायिक रोडमॅपची घोषणा केली. यावेळी पंपनीने ‘सायबरस्टर’ या स्पोर्टस् कारचे अनावरण केले. यावेळी एमजी मोटर इंडियाचे सीईओ एमिरेट्स राजीव छाबा, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल उपस्थित होते.

सीईओंची गोलमेज परिषद

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) आणि वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या इंडियन आरईआयटीएस  असोसिएशनची पहिली सीईओ गोलमेज बैठक पार पडली. या बैठकीला ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे एमडी आलोक अग्रवाल, एम्बेसी आरईआयटीचे सीईओ अरविंद मैया, माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आरईआयटीचे सीईओ रमेश नायर आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचे सीईओ दलीप सहगल उपस्थित होते.

सोन्याचा भाव उतरला

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी घसरण झाली. 24 पॅरेट सोने आज 669 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीच्या किमतीत 1258 रुपयांची घसरण झाली. 23 पॅरेट सोन्यासाठी आता 65980 रुपये मोजावे लागतील. 22 पॅरेट सोने 613 रुपये स्वस्त होऊन 60 हजार 680 रुपयांवर पोहोचले आहे. चांदी प्रतिकिलो 75045 रुपयांवर पोहोचली आहे.