मोदींचा सत्तेचा उन्माद रोखायलाच हवा – शरद पवार

ज्यांच्या हातात दहा वर्षे सत्ता दिली त्यांनी जनतेची फसवणूक केली. जनतेला जे शब्द दिले तशी कृती केली नाही. कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे. झारखंड, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ते मोदी यांनी दाखवले आहे. हे थांबवायचे असेल तर त्यांचा पराभव करण्यासाठी तयार रहा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यापूर्वी तीनही उमेदवार आणि प्रमुख नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तळपत्या उन्हात रास्ता पेठेत प्रचंड जाहीर सभा झाली. या सभेत पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

महागाई आणि बेरोजगारी हे देशातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र त्यांनी ते दुर्लक्षित केले, असे सांगून शरद पवार म्हणाले, मोदी हे 2014ला महागाई कमी करू असे सांगून सत्तेवर आले. जनतेला शब्द द्यायचे आणि ते विसरायचे, त्यावर काहीच करायचे नाही, असे चालले आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

लोक विसरतील याची मोदींना भीती – पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात एकटय़ा मोदी यांचेच 48 पह्टो आहेत. पेट्रोल पंपावर त्यांचेच पह्टो. इतकेच नाही कोरोनाच्या लस प्रमाणपत्रावरही त्यांचे पह्टो होते. पह्टो लावले नाहीत तर लोक आपल्याला विसरतील याची भीती त्यांना आहे.

तर माझा मोबाईल नंबर द्या – सुप्रिया सुळे

ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. अनेक जण सांगतात, आम्हाला पह्न येतो. यापुढे पह्न करून जो तुम्हाला धमकी देईल त्याला माझा मोबाईल नंबर द्या, असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, यापूर्वी आम्ही कधीही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातलं नाही, परंतु यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार असे जाहीर केले.

दरम्यान, राज्यातील जनतेचे ठरलं आहे, बळकट हातामध्ये मशाल पेटवून स्वाभिमानाची तुतारी फुंकायची आहे, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, उपनेता सुषमा अंधारे, विश्वजित कदम, भूषणसिंह होळकर, रोहित पवार, अशोक पवार, रोहिणी खडसे, संग्राम थोपटे, संजय जगताप, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे हे पेंद्रातील शक्तीच्या विरोधात दोन हात करून लढत आहेत – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात म्हणाले, पेंद्रातील शक्तीच्या विरोधात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी लढत आहेत. शरद पवार यांचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पेंद्रातील शक्तीच्या विरोधात दोन हात करून लढत आहेत़ लढणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचा या निवडणुकीत सन्मान व्हायला पाहिजे, असे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.