Lok Sabha Election 2024: साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तब्येतीच्याकारणास्तव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. मात्र पक्षासाठी सर्व काम करेन असे त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. सातारा जिल्ह्यातून उमेदवारी द्यायला विशेष काळजी घ्यावी लागते, असे म्हणत शरद पवारांनी सस्पेन्स वाढवला.

श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पुढील दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर केला जाईल, असे शरद पवार म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

साताऱ्यातील जागेसाठी दोन-तीन नावे चर्चेत आहेत. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने यांच्यासह सत्यजित पाटील ही नावे चर्चेत असून यावर आम्ही चर्चा करून उमेदवाराची घोषणा करू, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच साताऱ्यातून निवडणूक लढववण्यासाठी मलाही आग्रह होत असल्याचे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)