चंद्रपूर जिल्ह्यात तुफान गारपीट; मिरची, मका, गहू, ज्वारी पिकाला फटका

Hail-storm

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली. अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. सध्या शेतात मिरची, मका, हरबरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.