निवडणूक संपताच राणा दाम्पत्याची पुन्हा कोर्टवारी सुरू

अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांना सत्र न्यायालयाने 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोघांनी दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप आहे. शुक्रवारी अमरावतीमध्ये मतदान होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना हजेरीपासून एक दिवस सूट दिली, मात्र पुढील तारखांना हजर राहण्याचे बजावले.

एप्रिल 2022 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणचा दिखावा केला होता. या प्रकरणात कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. दोघांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज न्यायालयाने डिसेंबरमध्ये फेटाळला होता.