माजी पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया

केंद्राने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केल्यानंतर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इंडियाटुडेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मी त्यांचं स्वागत करते’.

माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या व्यतिरिक्त, सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि भारताच्या ‘हरित क्रांती’मध्ये प्रमुख भूमिकेसाठी ओळखले जाणारे कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न बहाल केला आहे.