
>> नीलिमा प्रधान
मेष – समतोल राखा
चंद्र शुक्र लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो समतोल राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांचे ऐका. धंद्यात चातुर्य, तत्परता दाखवा. कुठेही कायद्याचे उल्लंघन करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. चर्चा ऐका. शुभ दि. 21, 22
वृषभ – कामे मार्गी लावा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. क्षुल्लक अडचणींना महत्त्व न देता कामे करा. जवळच्या व्यक्तींना कमी लेखू नका. कठीण कामे मार्गी लावा. नोकरीधंद्यात कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनतेसमवेत वाद नको. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. शुभ दि. 19, 24
मिथुन – परिचयाचा लाभ होईल
बुध, शुक्र लाभयोग, तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. सहनशीलता ठेवा. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. दिग्गजांचा परिचय फायदेशीर ठरेल. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडाल. मोठे ध्येय गाठा. शुभ दि. 20, 21
कर्क – नोकरीत यश मिळेल
चंद्र, शुक्र लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. कठीण कामे वेगाने पूर्ण करा. भाषा योग्य वापरा. नोकरीत यश मिळेल. धंद्यात जम बसवा. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वापदाधिकार मिळेल. शुभ दि. 19, 20
सिंह – कामे रेंगाळतील
चंद्र, बुध त्रिकोणयोग. उताव्हेपणा, आक्रमकता, अहंकार यामुळे कामे रेंगाळतील. गैरसमज वावेळेला महत्त्व द्या. आग्रही भूमिका तणाव निर्माण करेल. धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध भूमिका घ्या. शुभ दि. 20, 21
कन्या – अनाठायी खर्च होतील
शुक्र, शनि षडाष्टक योग. प्रकृतीची काळजी घ्या. नात्यात, मैत्रीत गैरसमज होईल. अनाठायी खर्च होतील. नोकरीत प्रभावी कामे कराल. धंद्यात जम बसेल. नवीन परिचयात सावध. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामगिरी कराल. शुभ दि. 21, 24
तूळ – अधिकार लाभतील
सूर्य, चंद्र त्रिकोण, सप्ताहाच्या सुरूवातीला तडजोड करावी लागेल. कामांना गतिमान करा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत कठीण काम कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. लोकप्रियता लाभेल. यश मिळेल. शुभ दि. 24, 25
वृश्चिक – चातुर्याने प्रश्न सोडवाल
चंद्र, गुरू लाभयोग. कुशलता वापरा. फसगत टाळा. बुद्धिचातुर्याने प्रश्न सोडवाल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरी-धंद्यात सुधारणा करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींच्या समवेत चर्चा होईल. करारात यश मिळेल. शुभ दि. 19, 20
धनु – दूरदृष्टिकोन ठेवा
चंद्र, बुध त्रिकोण योग. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी संयम, दूरदृष्टिकोन ठेवा. संमिश्र यश मिळेल मात्र मोठी शिकवण मिळेल. धंद्यात लाभ होईल. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर यश मिळेल. शुभ दि. 19, 20
मकर – कामाचा व्याप राहील
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मित्र, आप्तेष्ट यांच्याशी नाराजी होईल. तुमचे बोलणे कठोर वाटेल. सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप राहील. धंद्यात वाद नको. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आमिषाला बळी पडू नका. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 19, 20
कुंभ – यश खेचावे लागेल
चंद्र, शुक्र लाभयोग, अडचणीतून यश खेचावे लागेल. मनात नसताना एखाद्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. वाक्चातुर्य, मधुर भाष्य यश देणारे ठरेल. नोकरीत गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. शुभ दि. 21, 24
मीन – मोह, व्यसन टाळा
चंद्र, गुरू लाभयोग, क्षुल्लक अडचणींना दूर करून यश मिळवावे लागेल. मोह, व्यसन नको. नवीन परिचय फसवा ठरेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांकडून आश्वासन मिळेल. खाण्याची काळजी घ्या. शुभ दि. 20, 24



























































