शॅम्पूच्या बाटलीत 20 कोटी रुपयांचे कोकेन; मुंबई विमानतळावर एक महिला अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिएरा लिओनमधील एका महिलेला 19.79 कोटी रुपयांचे 1,979 ग्रॅम कोकेन ताब्यात घेतले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

केनियाची राजधानी नैरोबी येथून मुंबईत उतरलेल्या या महिलेला एका गुप्त माहितीवरून रविवारी ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

‘आम्हाला ती नेत असलेल्या वस्तू जसे की शूज, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली इत्यादी जड आणि कडक असल्याचे आढळले. आम्ही त्यांची तपासणी केली तेव्हा आम्हाला या वस्तूंमध्ये पांढरी पावडर लपवून ठेवलेली आढळली’, अशी माहिती डीआरआय अधिकाऱ्याने दिली.

अटक करणाऱ्या पथकानं फील्ड किट वापरून पावडरची चाचणी केली असता, त्यात कोकेन असल्याचं आढळून आलं, असं निवेदनात म्हटलं आहे.

‘आम्ही 19.79 कोटी रुपयांचे 1,979 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. तस्करीच्या नेटवर्कची पुढील चौकशी सुरू आहे’, असं देखील अधिकाऱ्यानं सांगितलं.

त्याच एजन्सीनं गेल्या बुधवारी एका आंतरराष्ट्रीय कार्टेलच्या ड्रग्जचा भंडाफोड केल्यावर ताज्या घडामोडी घडल्या आहेत ज्यात त्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संबंधात चार जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून 100 कोटी रुपयांचं 9 किलो पेक्षा जास्त कोकेन जप्त केलं.

डीआरआयनं इंडोनेशिया आणि थाई राष्ट्रीयत्वाच्या दोन महिला प्रवाशांना अटक केली होती, ज्या इथिओपियातील अदिस अबाबा येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आली होती, तिच्याजवळ 9.83 किलो कोकेनसह पकडलं होतं.