अभिनेत्री सई लोकुरला कन्यारत्न

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिला कन्या रत्नाचा लाभ झाला आहे. रविवारी 17 डिसेंबर रोजी सईने मुलीला जन्म दिला.

सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती कपिल शर्मा सोबत एका हिंदी चित्रपटामध्येही झळकली होती. त्या नंतर मराठी बिग बॉस च्या पहिल्या सिझन मध्ये सई ने भाग घेतला होता. त्यात ती शेवटच्या पाच फायनालिस्ट मध्ये होती.

गरोदरपणात सई फार ॲक्टिव्ह होती. ती कायम इंस्टाग्राम वरून रिल शेअर करत होती.