आगळंवेगळं – 130 देशांत पोहोचलेले ईप्रसारण

>> मेघना साने

हिंदुस्थानी गाणी आणि भाषांतील कार्पाम जगभर पोहोचवणारा हा जगातील पहिला इंटरनेट रेडिओ म्हणजे ईप्रसारण इंटरनेट रेडिओ. अमेरिकेतील दोन मराठी दांपत्यांनी सुरू केलेल्या या रेडिओची ही कहाणी.

अमेरिकेतील दोन मराठी दांपत्यांनी म्हणजे वैद्य आणि गोखले नावाच्या हरहुन्नरी मराठी माणसांनी 2006 साली ईप्रसारण इंटरनेट रेडिओ सुरू केला. हिंदुस्थानी गाणी आणि हिंदुस्थानी भाषांतील कार्पाम जगभर पोहोचवणारा हा जगातील पहिला इंटरनेट रेडिओ ठरला. हिंदी, मराठी गीते, मान्यवरांच्या मुलाखती असे कार्पामाचे वैविध्य ठेवून ईप्रसारणने दर्जाही उत्तम राखला. त्यामुळे आजघडीला जवळ जवळ 130 देशांमधून एकूण 20 लाखांच्या वर श्रोते या रेडिओला लाभले आहेत.

नुसती गाणी नव्हे तर भाषेशी संबंधित व्यावसायिकांच्या मुलाखतीचा `लँग्वेज टॉक्स’ तसेच मराठी वाचकांसाठी `बुक रीडर्स टॉक’ हा कार्पाम आहे. यात वाचक आपण वाचलेल्या पुस्तकांवर बोलतात.

सध्याचे जग हे व्हिडीओचे आहे हे ओळखून आता व्हिडीओसुद्धा या ईप्रसारण इंटरनेट रेडिओमध्ये समाविष्ट होत आहेत. त्यामुळे या रेडिओचे नाव आता `ईप्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन’ असे झाले आहे. हिंदुस्थानातील लेखकांच्या, कलाकारांच्या व उद्योजकांच्या मुलाखती चित्रित करून दर महिन्याला एक एपिसोड बनवून मी `गप्पागोष्टी’ या सदरासाठी पाठवीत असते. आजवर प्रसारित झालेले `गप्पागोष्टी’चे सर्वच कार्पाम गुगलवर चॅनेलचे नाव टाकून पाहता येतात. ईप्रसारण रेडिओ हा 130 देशांमध्ये ऐकला/पाहिला जात असल्यामुळे या प्रत्येक मुलाखतीला सुमारे 50 लाख ह्यूज मिळाल्याची नोंद झाली आहे.

वैद्य आणि गोखले अमेरिकेत स्थायिक झाल्यावर आपल्या जीवनाचा एक भाग असलेले आकाशवाणी आणि विविध भारती व हिंदी, मराठी गाणी ऐकता येत नसल्याची रुखरुख दोघांनीही एकमेकांना बोलून दाखवली. गाणी ही आयुष्यात भावनांचे आदानप्रदान करत असतात. तसेच संगीत उत्साह वाढवते. आता जशी एका क्लिकवर यूटय़ूबवर किंवा गुगलवर गाणी ऐकता येतात तशी प्रगती त्या वेळी झाली नव्हती. मोबाइलही नव्हते. आपली हिंदी, मराठी गाणी ऐकवणारे एखादे रेडिओ स्टेशन असावे असे अनेकांना वाटत होते, पण ते तयार करणे फार खर्चिक होते.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेले अतुल वैद्य आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेले मिलिंद गोखले यांना इंटरनेट रेडिओची कल्पना सुचली आणि त्यांनी ती साकार केली. अतुल यांची पत्नी विद्या आणि मिलिंद यांची पत्नी मधुरा यांनी कार्पामांच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. अर्धांगिनींने अर्धी जबाबदारी घेतल्यामुळे निर्मात्यांचे काम सोपे झाले.

मधुराने `स्वरसंध्या’ कार्पामाची निर्मिती केली. हा कार्पाम गाण्यांचा असून एक विषय घेऊन केला जातो. सध्या मधुरा गोखले, नेत्रा जोशी आणि प्राजक्ता पटवर्धन हा कार्पाम करतात, तर विद्याने `आपली आवड’ हा श्रोत्यांनी सुचविलेल्या गाण्यांवर आधारित कार्पाम तयार केला. कॅलिफोर्नियात राहणारे वैद्य आणि गोखल्यांचे मित्र आनंद घाणेकर यांनी रेडिओसाठी `ईप्रसारण’ हे नाव सुचवले आणि विश्वास गोडबोले यांनी रेडिओसाठी मोठय़ा हौसेने `सिग्नेचर टय़ून’ करून दिली. तीन कार्पाम घेऊन हा रेडिओ सुरू झाला. 2006 पासून सुरू झालेल्या या इंटरनेट रेडिओला 1 मे 2024 रोजी 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्य म्हणजे हा रेडिओ उत्पन्न मिळविण्यासाठी चालविला जात नाही. यावर जाहिराती नसतात.

अतुल वैद्य आणि मिलिंद गोखले यांची टेक्निकल बाजू पण एवढी मजबूत होती की, लवकरच त्यांनी कार्पामाचे प्रोग्रामिंग करून ते सर्व अपलोड केले आणि ठरावीक वेळी तो आपोआप सुरू होईल अशी व्यवस्था केली. लोकांच्या मागण्या विविध गीतांसाठी येऊ लागल्यावर त्या गीतांचे कवी, संगीतकार वगैरे शोधणे आवश्यक होते. तसेच काही कार्पाम सादर करण्यासाठी संहिता लिहावी लागली. त्यासाठी विद्या आणि मधुरा यांनी मेहनत घेतली. सर्वांच्या कष्टाचे फळ म्हणजे ईप्रसारण इंटरनेट रेडिओ लोकप्रिय होऊ लागला. आपला रेडिओ अनेक देशांत ऐकला जातोय आणि फर्माइशचे मेल येत आहेत, हा विचार त्यांना प्रगतीकडे नेणारा होता.
ईप्रसारणवरील `माझा मराठीचा बोल’ यात मराठी माणसांना कथा, कविता असे साहित्य सादर करण्यासाठी खास वेळ दिली जाते. विविध प्रकारचे कार्पाम ऑडिओ स्वरूपात येथे अपलोड होतात. लवकरच ते व्हिडीओ स्वरूपातही होणार आहेत. हल्ली मुलांसाठी `गंमत जंमत’ हा करमणुकीचा कार्पाम सुरू आहे. हा कार्पाम अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली मराठी मुले सादर करतात. अनेक देशांतील लोकांना मराठी कार्पाम ऐकण्याची तहान भागवण्यासाठी `संगीत सुधा’ हा शास्त्राrय संगीतावर आधारित कार्पाम कॅलिफोर्नियाचे विवेक दातार सादर करतात.

कॅलिफोर्नियाचे मंदार कुलकर्णी यांच्या `विश्वसंवाद’ या कार्पामात काही आगळेवेगळे करणाऱया जगातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती प्रसारित होतात.

वेगवेगळय़ा देशांतील मराठी लोकांना त्यांच्या स्थानिक वेळेनुसार आपला रेडिओ ऐकता यावा म्हणून वेळेचे नियोजन करणे आवश्यक होते. अनेक देश चार ते पाच तास मागे किंवा पुढे असतात. मग सगळय़ांना कसा ऐकता येईल यावर विचार करून एक वैद्य यांनी एक तोडगा काढला. सर्वच्या सर्व कार्पाम सोमवारी ईप्रसारण. कॉम (www.ाज्rasaraह.म्दस्) या वेबसाईटवर अपलोड करून ठेवले जातात. ते आठवडाभर तेथेच राहतात. त्यामुळे लिंक वर जाऊन कोणीही केव्हाही कार्पाम ऐकू शकतात. ही सोय झाल्याने 130 देशांतील हिंदी, मराठी माणसे जोडली गेली. अमेरिकेतील अतुल वैद्य व विद्या वैद्य हे दांपत्य जगभरातील मराठी लोकांसाठी कार्पाम प्रसारित करतात ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे नाही का?

[email protected]