मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही ‘बेस्ट’ संपामुळे दिवसभर गोंधळ, सलग सातव्या दिवशी मुंबईकरांचे हाल, कामगारांमध्ये संभ्रम

best_undertaking_logo

कंत्राटी कामगारांच्या संपामुळे गेल्या आठवडाभरापासून ‘बेस्ट’ची सेवा पूर्णपणे कोलमडलेली असताना काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांसोबत केलेल्या चर्चेनंतरही आज संपूर्ण दिवसभर संपाबाबत गोंधळ सुरू होता. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगत काही आंदोलकांकडून संप मागे घेत असल्याची घोषणा प्रसारमाध्यमांशी बोलताना सकाळीच करण्यात आली. मात्र काही डेपोमध्ये रात्रीपर्यंत याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याने संप अद्याप सुरूच असल्याचे काही कामगारांकडून सांगण्यात येत होते. यामुळे दिवसभर प्रवाशांचे मात्र हाल झाले.

समान काम, समान वेतन’ तत्क राबवा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, वेतनवाढ द्या अशा मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कंत्राटी कामगारांनी 2 ऑगस्टपासून ‘काम बंद आंदोलन’ सुरू केले आहे. यामध्ये मुंबईकरांचे सहा दिवस हाल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी उशिरा रात्री संपकऱ्यांसोबत चर्चा केली. यामुळे काही भाजप नेत्यांकडून तातडीने संप मिटणार असल्याची घोषणा तातडीने करण्यात आली. मात्र दिवसभरात आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून याबाबत कोणतीही खात्री देण्यात आली नाही. मागण्या मान्य झाल्याचे काही आंदोलकांकडून सांगण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांबाबत कंपन्यांसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात होते. मात्र संप मागे घेतल्याची ठाम भूमिका कामगार किंवा ‘बेस्ट’ प्रशासनाकडूनही रात्री उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती.

अशी आहे समस्या

‘बेस्ट’मध्ये काहतूक सेवा पुरवण्यासाठी डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्किच मोबॅलिटी या कंपनीत चार वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवेत रुजू होताना करारात 22 हजार 500 रुपये केतन देण्यात येईल असे सांगण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात 17 हजार रुपये पगार हातात मिळतो. साप्ताहिक सुट्टी वेळेत मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱयांची फसवणूक होत आहे. 30 दिकसांपैकी 26 दिवस कामावर हजर रहावे लागते. नादुरुस्त बसेस चालवाव्या लागतात, असे कामगारांचे म्हणणे आहे.

‘एसटी’, स्कूल बस, कायम कर्मचारी मैदानात

‘बेस्ट’चे सुमारे 900 कंत्राटी कामगार संपावर गेल्याने प्रशासनाने अतिरिक्त ठरलेल्या आणि सध्या इतर विभागात काम करणाऱ्या सुमारे 800 कर्मचाऱयांना डय़ुटीवर बोलावले आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण 210 एसटी बस चालवण्यात आल्या. तसेच एसटीचे 35 बसचालकदेखील बेस्ट उपक्रमाच्या बस गाडय़ांवर कार्यरत होते. या व्यतिरिक्त 100 शाळेच्या बस गाडय़ा बेस्ट मार्गावर प्रवर्तित करण्यात आले आहे.