देशभरात सीएए कायदा लागू होणार, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू होणार आहे. केंद्राकडून या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच याविषयी भाष्य केलं होतं. निवडणुकीपूर्वी अधिसूचना जारी करण्यात येईल आणि त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असं शहा यांनी म्हटलं होतं.

या कायद्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व मिळू शकणार आहे. 31 डिसेंबर 2014 पर्यंत हिंदुस्थानात स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व देण्यात येणार आहे.