82 टक्के हिंदुस्थानी कंपन्यांवर सायबर हल्ले

cyber-crime-generic

एखादा वायरस एखाद्या सॉप्टवेअरमध्ये घुसला की संपूर्ण यंत्रणाच कोलमडून जाते. सायबर हल्ल्यांद्वारे बँक खाती रिकामी झाल्याची किंवा एखाद्या कंपनीची संपूर्ण यंत्रणाच हॅक केल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुस्थानातील तब्बल 82 टक्के हिंदुस्थानी कंपन्यांचा व्यवसाय केवळ सायबर हल्ल्यांमुळे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः पुढच्या दोन वर्षांत अनेक कंपन्यांसमोर सायबर हल्ल्यांचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या वर्षभरात 74 टक्के कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागल्याचे सीस्को सिस्टीम या संस्थेच्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

2024 मध्ये सायबर हल्ल्यांमुळे 55 टक्के कंपन्यांना व्यवसायात तब्बल 3 लाख डॉलरचे नुकसान सहन करावे लागल्याचे सायबर हल्ले रोखण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतलेल्या एका अहवालातून समोर आले आहे.

99 टक्के पंपन्या सायबर सुरक्षेचे बजेट वाढवणार                

देशभरातील 99 टक्के कंपन्या सायबर सुरक्षेचे बजेट वाढवण्याची शक्यता आहे. तर 95 टक्के कंपन्या सायबर सुरक्षेचे बजेट किमान 10 टक्क्यांनी वाढवू शकतात असे सिस्को सिस्टीम संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थानातील केवळ 4 टक्के कंपन्यांनी उत्तम दर्जाची सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्याची तयारी दाखवली आहे.