अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना चिंता नाही! 

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था गंभीर आजारी आहे. पण भाजपच्या तथाकथित डॉक्टरांना याची अजिबात चिंता नाही, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या ‘2023-24 मध्ये मजबूत अर्थव्यवस्था’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाच्या निव्वळ परकीय थेट गुंतवणुकीत 31 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही भाजप स्वतःला प्रमाणपत्र देत आहे. असे प्रमाणपत्र परदेशी आणि हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांकडून आले पाहिजे, असेही चिदंबरम म्हणाले. परदेशी गुंतवणूकदारांना भाजपची चुकीची धोरणे आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे अक्षम व्यवस्थापन लक्षात आले आहे. म्हणूनच गुंतवणूक येत नाही, असेही चिदंबरम म्हणाले.