अर्धा माणूस, अर्धे डुक्कर; विचित्र पिल्लू पाहून गावकरी घाबरले

फिलीपिन्समध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याच्या शेळीने अर्धा माणूस आणि अर्धे डुक्कर अशा अवतारील एका करडूला (पिल्लू) जन्म दिला आहे. हे करडू पाहून शेतकऱ्यालाही धक्का बसला असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सुलतान कुदारा (Sultan Kudarat) यांच्या मालकीचे शेत असून ते शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनही करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या एका शेळीने काही दिवसांपूर्वी एका विचित्र प्राण्याला जन्म दिला. गर्भवती शेळीला त्रास होऊ लागल्याने तिचे सिझेरियन करण्यात आले. मात्र सिझेरियन झाले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

शेळीने अर्धा माणूस आणि अर्धे डुक्कर अशा विचित्र प्राण्याला जन्म दिला. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला आणि तो मोठ्याने ओरडला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनीही त्यांच्या शेताकडे धाव घेतली. हा प्राणी नक्की काय होता हे सांगता येत नाही. पण ते नक्कीच शेळीचे करडू नव्हते. ते आमच्याच गावात जन्माला का आले याचा आम्ही विचार करत असल्याचे जोसेफिन नावाच्या गावकऱ्याने सांगितले.

दरम्यान, या विचित्र प्राण्याला जन्म दिल्यानंतर शेळीचा मृत्यू झाला. तसेच जन्मानंतर काही वेळाने हा विचित्र प्राणीही मरण पावला. शेळी आणि तिने जन्माला घातलेला विचित्र प्राणी यामुळे आधीच गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यात शेळी आणि त्या विचित्र प्राण्याचाही मृत्यू झाल्याने गावकरी अधिकच धास्तावले. आपल्या गावात एखादा शापित सैतान जन्माला आला असावा या विचारांनीच गावकऱ्यांना धडकी भरली आहे.

माणसाने बकरा कापला, बकऱ्याच्या डोळ्याने माणूस मेला; विचित्र घटनेची सर्वदूर चर्चा

फिलीपिन्स विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल सायन्सच्या डॉ. अगापिता सालसेस यांनी याबाबत सांगितले की, गर्भाशयामध्ये जनुकीय उत्परिवर्तन झाल्याने हा प्रकार घडला असावा. हा अनुवांशिक दोषही असू शकतो. तसेच शेळीला डास चावल्यानेमुळे तिला रिक्ट व्हॅली नावाचा आजार झाला असावा आणि त्यामुळे बाळाचा विकास खुंटला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ‘मिरर‘ने याबाबत वृत्त दिले आहे.