एसी-फ्रिजही मिळणार वूडन फिनिशमध्ये, गोदरेजने आणली नवीन सिरीज

हल्ली होम डेकॉरमध्ये वूड फिनिशिंग असलेल्या इंटिरियरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वूड फिनिशचे टेक्श्चर असलेल्या टाईल्स, फर्निचर वापरून घराला थोडा निसर्गाचा टच देण्याचा लोकं प्रयत्न करत असतात. लोकांच्या या प्रयत्नांना साथ देण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसने देखील एक वूड फिनिशची एसी फ्रिजची सिरीज बाजारात आणली आहे. इऑन वोग असे त्या सिरीजचे नाव असून नुकतीच ही सिरीज गोदरेजने लाँच केली आहे.

ब्रँडद्वारे केलेल्या हिंदुस्थानी घरांच्या सर्वेक्षणानुसार, 70% पेक्षा जास्त प्रतिसादकर्त्यांनी असे म्हटले होते की त्यांना त्यांच्या घराच्या सजावटीला अधिक अनुकूल अशा उपकरणांचे पर्याय बघण्याची ईच्छा आहे. अर्ध्याहून अधिक लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या घरात सर्वकाही चांगले जुळणारे, सुसंगत असावे असे वाटते. गोदरेज इऑन वोग सीरिजचे रेफ्रिजरेटर्स ओक आणि वॉलनट लाकूड अशा दोन शेड्समध्ये 272 ली. आणि 244 ली. क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत आणि ते ग्राहकांना 27, 000 ते 32,000 रु.च्या श्रेणीमध्ये उपलब्ध असतील. रेफ्रिजरेटर्स नॅनो शील्ड निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान (पेटंट लागू), मोठ्या प्रमाणात भाजीपाला साठवणूक, आणि पेटंट कूल शॉवर तंत्रज्ञानाद्वारे 95% हून अधिक पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासह येतात. एअर कंडिशनर सायप्रस, टीक आणि महोगनी या तीन शेड्स मध्ये 1.5 टन क्षमतेत आणि 35000 ते 38, 000 रु. रेंज मध्ये उपलब्ध आहेत. वीज बचतीसाठी 5-इन-1 परिवर्तनीय तंत्रज्ञान, अधिक आरामासाठी 4-वे स्विंग आणि अगदी 52 अंश सेल्सिअस तापमानातही हेवी-ड्यूटी कूलिंगसह सुसज्ज आहे. हे एसी R32 वापरतात. त्यामध्ये कमी ग्लोबल वार्मिंग रेफ्रिजरंट आहे. ही मालिका लवकरच भारतातील अधिकृत स्टोअर्स आणि इंडिया सर्कस वेबसाइट व्यतिरिक्त लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी https://www.godrej.com/appliances/eonvogue ला भेट द्या