हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 च्या विक्रीस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद, ऑक्‍टोबर पासून डिलिव्‍हरीला सुरूवात

जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सची सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि प्रतिष्ठित अमेरिकन मोटरसायकल-उत्‍पादक कंपनी हार्ले डेव्हिडसन यांनी सहयोगाने डिझाइन केलेली प्रिमिअम मोटरसायकल हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 ला 3 जुलै 2023 रोजी लाँच झाल्‍यापासून ग्राहकांकडून बुकिंग्‍जमध्‍ये अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे.

कंपनी 3 ऑगस्‍ट 2023 रोजी ऑनलाइन बुकिंग विंडो बंद करणार आहे आणि प्री-बुकिंग केलेल्‍या ग्राहकांसाठी राष्‍ट्रीय स्‍तरावर टेस्‍ट राइड्सना 1 सप्‍टेंबर 2023 पासून सुरूवात होईल. हिरो मोटोकॉर्प राजस्‍थानमधील नीमराणा येथील कंपनीच्‍या गार्डन फॅक्‍टरी येथे सप्‍टेंबरमध्‍ये हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 च्‍या उत्‍पादनाला सुरूवात करेल आणि ऑक्‍टोबर 2023 मध्‍ये ग्राहकांसाठी डिलिव्‍हरींना सुरूवात होईल. ग्राहकांसाठी डिलिव्‍हरी प्री बुकिंग तारखांनुसार प्राधान्‍यक्रमावर करण्‍यात येतील.

वाढत्‍या मागणीमुळे उत्‍पादन क्षमतेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. ऑनलाइन बुकिंग्‍ज पुन्हा सुरू होण्याची तारीख आणि पुढील विंडोची किंमत नंतर जाहीर केली जाईल.

हिरो मोटोकॉर्पचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्‍ता म्‍हणाले की, ”हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 साठी चौकशी व बुकिंग्‍जमध्‍ये वाढ होत असल्‍याचे पाहून आनंद होत आहे. आकारमानाने आतापर्यंत आमच्‍या अपेक्षांची पूर्तता केली आहे आणि आम्‍ही अशा टप्‍प्‍यावर पोहोचलो आहोत, जेथे आम्‍ही तात्‍पुरत्‍या कालावधीसाठी ऑनलाइन बुकिंग चॅनेल बंद करण्‍याचे ठरवले आहे.”

”मिळालेल्‍या प्रतिसादामधून राइडिंगप्रेमींचे हार्ले-डेव्हिडसन व हिरो मोटोकॉर्पसाठी असलेले ब्रॅण्‍ड प्रेम व विश्‍वास दिसून येतो. आम्‍ही हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 चे उत्‍पादन व डिलिव्‍हरींसाठी सज्‍ज असताना आम्‍हाला दर्जात्‍मक शक्‍ती, कार्यक्षमता व मूल्‍य तत्त्वासह ग्राहकांना अपवादात्‍मक राइडिंग अनुभव देण्‍याचा विश्‍वास आहे.”

मोटरसायकल डेनिम, विविड व एस या तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यांची किंमत अनुक्रमे 2,29,000 रूपये (डेनिम), 2,49,000 रूपये (विविड) आणि 2,69,000 रूपये आहे. हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 www.Harley-Davidsonx440.com या वेबसाइटला भेट देत 3 ऑगस्‍ट 2023 पर्यंत 5000 रूपयांच्‍या बुकिंग रक्‍कमेसह ऑनलाइन बुक करता येऊ शकते.

रस्‍त्‍यावरील लक्षवेधक उपस्थितीसह हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 मध्‍ये प्रतिष्ठित हार्ले-डेव्हिडसन ब्रॅण्‍डची विशिष्‍टता समाविष्‍ट आहे. लक्षवेधक डिझाइन, ऑल-मेटल बॉडी व शक्तिशाली इंजिनसह ही मोटरसायकल स्‍टाइलमध्‍ये खऱ्या परफॉर्मरचे व्‍यक्तिमत्त्‍व दाखवते. वाहतूकीमध्‍ये सहजपणे व गतीशीलपणे ड्रायव्हिंगची खात्री, तसेच खडतर प्रदेशामध्‍ये उत्तम व आरामदायी ड्रायव्हिंगच्‍या खात्रीसह हार्ले-डेव्हिडसन एक्‍स440 चा राइड दर्जा प्रेरणादायी राइडिंगचा नवीन अनुभव देते.