Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी पुन्हा आळवला ‘चहा’चा राग; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी 26 मे रोजी मतदान पार पडले. आता अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रचारही शिगेला पोहोचला आहे. मात्र पहिल्या काही टप्प्यातच बॅकफूटवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जुने रडगाणे नव्याने ऐकवण्यास सुरुवात केली असून ‘चहा’चा राग आळवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा ‘चहा’चा राग आळवला. कप, प्लेटस धूत आणि चहा विकत मी लहानाचा मोठा झालो. मोदी आणि चहातील नाते एका धाग्यात गुंफलेले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

समाजवादी पार्टीसाठी आपले मत वाया घालवण्यास कोणी इच्छूक नाही. बुडणाऱ्याला कोणीही मत देणार नाही. ज्याचे सरकार बनणार आहे, त्यालाच सामान्य लोकं मतदान करतील, असेही ते म्हणाले.